१ जून जागतिक वाढदिवस दिन
पत्रिका न काढता कुंडली न काढता न पाहताही आयुष्यात यशस्वी होता येतं याचा धडधडीत पुरावा म्हणजे १ जून जन्मतारीख असलेली कर्तृत्ववान माणसं !
तारीख, वेळ, दिवस, वार, हे सर्व माणसाने मोजण्यासाठी केलेली एकक आहेत जस किलो, मीटर, फूट ही जशी एकक अगदी तसच हि पण एकक हे साधं सोपी गोष्ट समजून घेतलं की यश त्यावर गोष्टींवर अवलंबून नसतं तर यश माणसाच्या कर्तृत्वावर कर्मावर ठरतं हे मान्य करायला लागत!
पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून अलिप्त ठेवलेल्या समाजाला शिक्षणाची दार समाजसुधारकांनी उघडली गावोगावी शाळा काढल्या अशा शाळेत जाणारी अडाणी आईबापाची लेकरं ही, जन्म तारीख विचारली तर ह्यो जन्मला तवा संक्रांत 4दिवसावर होती, दिवाळी तोंडावर होती, तवाच्या साली दुष्काळ पडलाता बघा अशी उत्तरे मिळत. गुरुजींनीच मग शाळेसाठी म्हणून 1 जून 1965, 66, 67, 68, 69, 70, 71,72, 73, 74, 75... अशा तारखा टाकल्या. रीतसर शिक्षण घेणारी ही पहिली पिढी आपल्या कर्तृत्ववाने यशस्वी झाली नेटाने संसार केला आपल्या पोरांना इंजिनिअरिंग मेडिकल अस उच्चशिक्षण दिल.
आता यांची पुढची उच्चशिक्षित पिढी पत्रिका, कुंडली, मुहूर्त यात अडकली. जस चूल मूल यात अडकलेली स्त्री शिकण्यासाठी समाजसुधारकांनी खस्ता खाल्या सनातनी धर्माचा रोष सहन केला सावित्रीबाईनी शेणचा मारा सहन केला. ती स्त्री शिकली आणि गुरुवारी शामबालेची कथा वाचत बसली. 100वर्षांपूर्वी अस्तित्वात नसलेल्या पण आता देव झालेल्या बाबा महाराज यांच्या बैठकलीला जाऊ लागली.
समाजात आलेल्या या नव्या कुंडली पत्रिका, मुहूर्त तसेच अनेक बाबा महाराज या गोष्टीचा मागे लागण्या आधी आपण आपल्या बापजाद्यानी या गोष्टी केल्या होत्या काय, त्यांचं काय अडलं होत का त्या शिवाय, याचा साधा सरळ विचार केला पाहिजे व मिळणारे उत्तर स्वीकारले पाहिजे नाहीतर या शिकलेल्या तिसऱ्या चौथ्या पिढीपेक्षा पहिल्या पिढीला शाळेत घालणारी व लौकिक अर्थानी अडाणी असणारी पिढीच खरी बुद्धिमान पिढी म्हणायचं बाकी या पिढीने घोकंपट्टी करून डिग्र्या घेतल्या पण बुद्धीचा वापर केला का हे पाहणं एक शोध ठरेल.
१ जून वाढदिवस असणाऱ्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🎂💐
0 Comments